महाराष्ट्र

maharashtra

जीएमसीतील आंतरवासिता डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; कोविड वार्डातील रुग्णसेवेवर परिणाम

By

Published : May 5, 2021, 7:58 PM IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वार्डमध्ये कार्यरत असलेल्या आंतरवासिता डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करीत अधिष्ठाता यांच्या कक्षात समोर ठिय्या देऊन नारेबाजी केली.

Intern Doctor agitation for his various demands in akola
जीएमसीतील आंतरवासिता डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; कोविड वार्डातील रुग्णसेवेवर परिणाम

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वार्डमध्ये कार्यरत असलेल्या आंतरवासिता डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करीत अधिष्ठाता यांच्या कक्षात समोर ठिय्या देऊन नारेबाजी केली. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी या आंतरवासिता डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.

कोरोना महामारीचा प्रचंड प्रकोप उभा झाला आहे. त्या अनुषंगाने 2016 वर्षाची बॅच आंतरवासिता डॉक्टर या महामारीमध्ये तसेच कोविड वॉर्डमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत. फ्रंट लाईन वर्कर म्हणून ते सहकार्य करीत आहेत. मागील वर्षापेक्षा ही कोविडची दुसरी लाट ही भयानक आहे. त्याबद्दल शंका नाही. आंतरवासिता डॉक्टर केवळ 360 रुपये प्रतिदिन व त्यामध्ये आपल्या जीवाची परवाह न करता या महामारीत सामना कोरोना रुग्ण सेवा व त्यामार्फत राष्ट्र सेवा करीत आहे.

आंदोलक डॉक्टर माहिती देताना...
मुंबई व पुण्याच्या आंतरवासिता डॉक्टरांना मागील वर्षी 50 हजार रुपये मानधन देण्यात आले. त्याच प्रमाणे आम्हाला ही 50 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी या आंतरवासिता डॉक्टरांनी केली आहे. तसेच शासनाने सर्व आंतरवासिता डॉक्टरांना विमा कवच प्रदान करावे, कोविड ड्युटी दरम्यान आजारी पडल्यास उपचार याची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घ्यावी, यासह आदी मागण्या या आंतरवासीता डॉक्टरांनी केली आहे.
आंतरवासिता डॉक्टरांनी दुपारपासून काम बंद आंदोलन पुकारले. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. या डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना निवेदन देऊन त्यांच्या कक्षा समोर ठिय्या आंदोलन केले आहेत. शासनाच्या विरोधात त्यांनी नारेबाजी करीत मागण्याही मागितल्या आहे. शासनाने या मागण्या लवकर मंजूर कराव्यात, अशी मागणी या आंतरवासिता डॉक्टरांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details