अकोला :येथीलआझाद कॉलनीत राहणाऱ्या, व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज(सोमवार) दुपारी उघडकीस आली. विशाल प्रभाकर वानखडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एका इन्शुरन्स कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अकोला: विमा कंपनीतील अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - विमा कंपनीतील अधिकाऱ्याची आत्महत्या अकोला बातमी
आझाद कॉलनीत राहणाऱ्या, एका विमा कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशाल प्रभाकर वानखडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद कॉलनीत राहणारे विशाल प्रभाकर वानखडे हे एका नामांकित कंपनीत इन्शुरन्स अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते घरी असताना त्यांनी त्यांच्या खोलीतील पंख्याला गळफास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. खदान पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्यावर असलेल्या कामाचा ताण किंवा घरगुती वाद या करणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा -सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल