अकोला - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अकोल्यात आज ५० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यातील ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज कोरोना चाचणीचे 50 अहवाल प्राप्त झाले असून यातील 46 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांनध्ये एक दीड वर्षाचा मुलगा, एक आठ वर्षाचा मुलगा, एक 62 वर्षीय व्यक्ती तर एक 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण भवानी पेठ तारफैल या भागातील रहिवासी आहेत.
आज प्राप्त अहवाल - 50
पॉझिटिव्ह - 04
निगेटिव्ह - 46