अकोला -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बेड अपुरे पडत आहे. अशावेळी शहरात बांधण्यात आलेला सुपरस्पेशालिटी रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून आवश्यक साहित्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे येथे रुग्ण उपचार व्यवस्था अद्याप सुरू झालेली नाही. दरम्यान कोविड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच या रुग्णालयाची पाहणी केली आहे. शिवाय संबंधित अधिकारी व डॉक्टरांसोबत चर्चा करत रुग्णालयाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
या वर्षी मिळाली मंजुरी
रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे ही इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची चर्चा होत आहे.
इमारत शोभेची वास्तू ?