अकोला - रेमडेसिवीर कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध विक्रेत्यांनी इंजेक्शनच्या बाटलीवर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक नमुद करावा, असे निर्देश सहायक आयुक्त(औषध) वि. द. सुलोचने यांनी दिले आहे.
रेमडेसिवीरच्या बाटलीवर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक लिहा ; अन्न व औषध विभागाचे निर्देश - रूग्णांचे नाव आता रेमडेसिवीर बाटलीवर
रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ नये म्हणुन प्रत्येक किरकोळ विक्रेत्याने इंजेक्शन बाटलीवर रुग्णाचे नाव, बिल क्रमांक नमूद करावा असे, निर्देश अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही रुग्णाला इंजेक्शन देण्यापुर्वी त्यावर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक असल्याची खात्री करावी व रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त(औषधे) वि. द. सुलोचने यांनी केले आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ नये म्हणुन प्रत्येक किरकोळ विक्रेत्याने इंजेक्शन बाटलीवर रुग्णाचे नाव, बिल क्रमांक नमुद करावा असे, निर्देश अन्न व औषध प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही रुग्णाला इंजेक्शन देण्यापुर्वी त्यावर रुग्णाचे नाव व बिल क्रमांक असल्याची खात्री करावी व रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त(औषध) वि. द. सुलोचने यांनी केले आहे.कोरोना उपचारासाठी वापरात येणारे औषध रेमडेसिवीरचा काही समाजकंटकांकडून अधिक किंमतीत विक्री करण्याचे प्रकरण पोलीस यंत्रणा आणि अन्न व औषध प्रशासनाव्दारे उघडकीस आणले असुन या प्रकरणी सिव्हील लाइन पोलीस स्टेशन अकोला येथे औषध निरीक्षक संजय राठोड यांनी गुन्हा नोंदविलेला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.