अकोला - शहरातील खदान परिसरातील शासकीय गोदाम येथे एका घरावर छापा टाकला असता घरातुन विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे, स्थानिक गुन्हे शाखेने की कारवाई केली असून याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खदान परिसरातील घरातून विदेशी पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून एका घरातुन विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सुरजसिंग उर्फ विरु जसवंत टाक याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार यांना एका व्यक्तीने विना परवाना शस्त्र बाळगल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून, त्यांनी सुरजसिंग उर्फ विरु जसवंत टाक याच्या घरी छापा टाकला. यावेळी विदेशी बनावटीच्या पिस्तुलसह तीन जिवंत काडतुस जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, प्रमोद डोईफोडे, अश्विन शिरसाट, फिरोज खान, संदीप टाले, मनोज नागमते, भाग्यश्री मेसरे यांनी केली आहे.