अकोला :येथे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे विशेष पथक गस्तीवर असताना आलेगाव व जाम्ब या परिसरातील नदीपात्रात अवैधरित्या गावठी दारू काढण्यात येत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या माहितीवरून पथकाने आज(सोमवार) दुपारी सदर ठिकाणी छापा टाकत 5 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 1 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर चान्नी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा गावठी दारू अड्ड्यावर छापा, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - illegal liquor seized in akola news
गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने आलेगाव येथील डुक्करतली नाल्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला. यात दोघांना अटक करत गावठी दारू आणि इतर साहित्य जप्त करून मोहासडवा नष्ट केला. तर, जाम्ब येथे टाकलेल्या छाप्यात लेंडी नाल्यात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पथकाने 1 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
![अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा गावठी दारू अड्ड्यावर छापा, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त गावठी दारू अड्ड्यावर छापा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-06:12:35:1596458555-mh-akl-02-raid-winery-7205458-03082020180440-0308f-1596458080-497.jpg)
रात्रपाळीदरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाने आलेगाव येथील डुक्करतली नाल्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकला. या ठिकाणाहून शेख शरीफ शेख शहाबुद्दीन, बाळू तेलगोटे यांना अटक करण्यात आली. तसेच, त्यांच्याजवळ असलेला मोहासडवा, गावठी दारू आणि इतर साहित्य जप्त करून मोहासडवा नष्ट केला. तर, जाम्ब येथे टाकलेल्या छाप्यतत लेंडी नाल्यात सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर रामचंद्र लठाड, दीपक बोरकर, गजानन डाखोरे हे दारू गाळताना मिळून आले. पथकाने गावठी दारू आणि इतर साहित्य जप्त करून मोह सडवा नष्ट केला. यामध्ये पथकाने 1 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.