महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारी अवैध देशी दारू जप्त - सागर नागोराव इंगळे

अवैध धंद्यावर कारवाईसाठी गस्त घालत असता तेल्हारा तालुक्यातील विशाल गोवर्धन सरदार, सागर नागोराव इंगळे, निलेश लक्ष्मण डिगे हे त्यांच्या मोटर सायकलवर अवैधरित्या देशी दारू आणत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

बुल़डाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारी अवैध देशी दारू जप्त

By

Published : Sep 28, 2019, 9:01 PM IST

अकोला -तेल्हारा येथे बुलडाणा जिल्ह्यातून अकोल्यात विक्रीसाठी आणली जाणारी अवैध्य दारू पोलिसांनी जप्त केली. पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ६० हजार ४४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुल़डाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारी अवैध देशी दारू जप्त

हे ही वाचा -अकोल्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

अवैध धंद्यावर कारवाईसाठी गस्त घालत असता तेल्हारा तालुक्यातील विशाल गोवर्धन सरदार, सागर नागोराव इंगळे, निलेश लक्ष्मण डिगे हे त्यांच्या मोटर सायकलवर अवैधरित्या देशी दारू आणत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने ग्राम उकळी बाजार ते पोदरी रोडवर तसेच तेल्हारा रोड या ठिकाणी सापळा रचला. या ठिकाणी दोन मोटरसायकली येताना दिसून आल्या. त्यावरील व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्याकडे असेलेल्या पिशव्यांची तपासणी केली. त्यामध्ये देशी दारूच्या ७२० बाटल्या आढळल्या. आरोपींकडील दोन मोटर सायकल, ०३ मोबाईल आणि देशी दारू असा एकूण १ लाख ६० हजार ४४० रूपयांचा मद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे हा वाचा -अकोल्यात लाच घेताना जमादार एसीबीच्या जाळ्यात

ABOUT THE AUTHOR

...view details