महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर पालकमंत्री असल्याचे विसरून जाईल; बच्चू कडूंचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दम - अकोला बच्चू कडू बातमी

वॉर्डातील अस्वच्छता, स्वयंपाक गृहातील नोंदी अद्ययावत नसणे, धान्याच्या नोंदी अद्ययावत नसणे, कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या रजिस्टरवर नोंदी नसणे, यासोबतच कंत्राटदारांवर अस्वच्छता असल्यावरून कारवाई न केल्यामुळे बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Bachchu Kadu in akola
...तर पालकमंत्री असल्याचे विसरून जाईल; बच्चू कडूंचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दम

By

Published : May 14, 2021, 2:29 AM IST

अकोला -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री बच्चू कडू वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. वॉर्डातील अस्वच्छता, स्वयंपाक गृहातील नोंदी अद्ययावत नसणे, धान्याच्या नोंदी अद्ययावत नसणे, कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या रजिस्टरवर नोंदी नसणे, यासोबतच कंत्राटदारांवर अस्वच्छता असल्यावरून कारवाई न केल्यामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे अस्वच्छता दिसल्यास मी पालकमंत्री असल्याचे विसरून जाईल आणि कोणालाही सोडणार नाही, असा दम त्यांनी वैद्यकीय अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांना दिला.

कंत्राटदारांवर व्यक्त केला रोष -

आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील सभागृहात वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या ठिकाणी स्वच्छतेसाठी असलेल्या कंत्राटदारांच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना वॉर्डासह इतर सर्व वॉर्डामध्ये अस्वच्छता असल्याचे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित कंत्राटदार हे दररोज नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वॉर्डात स्वच्छता करीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कंत्राटदारांनी कोणत्या वार्डात किती कर्मचारी नेमले किंवा कंत्राटदारांनी किती कर्मचारी रोज स्वच्छतेसाठी नेमले आहे, या संदर्भातील कुठलीच नोंद त्यांना मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात कंत्राटदारांवर आपला रोष व्यक्त केला. 15 दिवसांच्या आत नोंदवही अद्यावत करण्याचे आदेश त्यांनी दिले. जे कंत्राटदार व्यवस्थित काम करीत नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी; लाख रुपये दंड त्यांच्याकडे वसूल करून घ्यावा. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिले.

जेवणाचा चार्ट प्रत्येक वार्डात लावण्याचे आदेश -

यावेळी त्यांनी स्वयंपाक गृहाचीही पाहणी केली. तेथे शिजत असलेल्या अन्नाची तपासणी केली. तसेच तेथे लावण्यात आलेल्या दिवसभरातील जेवणाच्या चार्ट संदर्भात संबंधितांना हा चार्ट प्रत्येक वार्डात लावण्याचे आदेश दिले. तसेच त्या ठिकाणी महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या धान्याच्या नोंदीची ही पाहणी त्यांनी केली. स्वयंपाकाच्या संदर्भात आणि धान्याच्या संदर्भातील नोंदी या व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिरसम यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर ही कारवाई करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. जबाबदारी व्यवस्थित पार पाळा; अन्यथा मी कोणालाही सोडणार नाही, असा दम पालकमंत्री बच्चू कडू यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा - ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचे बक्षीस

ABOUT THE AUTHOR

...view details