अकोला- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पत्रामुळे शिवसेनेच्या शिस्तबद्ध पदाधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत मात्र, अकोल्याचे पालकमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे हे योग्य भूमिका घेतील, असे ते म्हणाले. तसेच गडकरी साहेबांचा मी पण एक चाहता आहे, असेही ते म्हणाले.
'मी गडकरींचा चाहता आहे' -
या पत्राबाबत पालकमंत्री बच्चू कडू बोलताना म्हणाले, मी पण एक त्यांचा चाहता आहे. केंद्रात सगळ्या चांगले काम करणारे आणि प्रभावी नेते आहेत. पण उद्धव ठाकरेही तोलामोलाची आणि तितक्याच ताकदीचे नेते आहेत. उद्धव ठाकरे नक्कीच त्या पत्राबाबत काय खरे आहे, खोट आहे, हे पाहून दोघांचाही उद्देश सारखाच आहे. या सगळ्यात खरी बाजू समोर येईल, असे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.