अकोला -चिंचोली येथे कौटुंबिक वादातून पती-पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शीतल सुनील शिरसाट आणि सुनील देवराव शिरसाट असे या दाम्पत्याचे नाव आहे.
अकोला: कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नीचा मृत्यू - अकोल्यात पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
सुनील शिरसाठ व शीतल शिरसाठ हे दोघेही ही आपल्या शेतामध्ये कामासाठी गेले होते. शेतातच दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे सुनील शिरसाठ यांनी फवारणीचे औषध घेतले. त्यानंतर शितल शिरसाट यांनी शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेतली.
सुनील शिरसाठ व शीतल शिरसाठ हे दोघेही ही आपल्या शेतामध्ये कामासाठी गेले होते. शेतातच दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे सुनील शिरसाठ यांनी फवारणीचे औषध घेतले. त्यानंतर शितल शिरसाट यांनी शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेतली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बार्शी टाकळी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुनील शिरसाठ यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
हेही वाचा - नागपूरमध्ये बनावट पिस्ता विकणारी टोळी गजाआड, दीड टन माल जप्त
शीतल शिरसाठ यांचा विहिरीत शोध घेण्यात आला. संत गाडगेबाबा आपत्कालीन व बचाव पथकाने शीतल यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. बार्शी टाकळी येथील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेतली. या घटनेमागील मुख्य कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. या दांम्पत्याला एक वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे.