अकोला - हिवरखेड येथील हॉटेल व्यावसायिकाने गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन भड असे व्यावसायिकाचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हिवरखेड येथे हॉटेल व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या - latest akola news
हॉटेल व्यावसायिकाने गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन भड असे व्यावसायिकाचे नाव आहे.
अकोला आत्महत्या
हिवरखेड येथील बस स्थानकाजवळ राहणारे हॉटेल व्यावसायिक गजानन भड यांनी हिवरखेड सोना रस्त्यावर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या नेमकी का केली असावी, याबाबत गावात तर्कवितर्क लावले जात आहेत.