अकोला- वेगवेगळे छंद जोपासत त्याच्याभोवतीच आपले आयुष्य जगणारे अनेक जण आहेत. स्वत:च्या छंदातून प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचलेलेही अनेक जण पाहायला मिळतात. असाच एक वेगळा छंद अकोल्यातील उत्कर्ष जैन याने जोपासला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आगपेट्या जमा करण्याचा छंदातून त्याला तो आनंद मिळवत राहतो. आतापर्यंत त्याने साडेतीन हजारांपेक्षा जास्त आगपेट्या जमा केल्या आहेत.
छंद जोपासत आपला उदरनिर्वाह करणारे अनेक लोक आपण बघतो. तर फक्त छंद म्हणून त्यातून आनंद घेणारेही अनेकजण या आहेत. अकोल्यातील उत्कर्ष जैन हा सुद्धा आगपेटी जमा करण्याच्या छंदातून आनंद मिळवत आहे. सध्या त्याच्याकडे ३ हजार ५०० पेक्षा जास्त आगपेट्य़ा आहेत. यामध्ये क्रांतिकारक, चित्रपट अभिनेत्री, अभिनेता यांच्यासह प्राणी, झाडे, फुले, मोटर, कपडे धुण्याचे पावडर, चहा, विविध गुटखा पुडी यांच्या छायाचित्राच्या आगपेटी आहेत. तसेच विदूषक, देवांची छायाचित्रे, बिडी, चित्रपटांच्या नावांचीही आगपेटी त्याच्याकडे आहेत.