महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

अकोला तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ४७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

By

Published : Mar 22, 2021, 3:20 PM IST

rainstorm in akola
rainstorm in akola

अकोला -विजांच्या कडकडडाटात अवकाळी पावसाने अकोला जिल्ह्यात सकाळीच जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. जिल्हाभरात बरसलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे सुमारे ४७७० हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे अकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या चार दिवसांपासून अकोल्यामध्ये वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण आणि जोरदार वारा अशी परिस्थिती गेल्या चार दिवसांपासून अकोल्यात आहे. बऱ्याच भागात तुरळक पाऊसही यादरम्यान पाडला. शनिवारी झालेल्या पावसाने मात्र चांगलाच जोर पकडला होता. परंतु, रविवारी दिवसभर ऊन होते. मात्र, रात्रीपासून वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले होते. ढगांचा कडकडाट रात्रभर सुरू होता. सकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली.

heavy rainstorm in akola


हेही वाचा -गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचे काय होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली बैठक

फळबाग आणि भाजीपाल्यांना फटका
अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे शेतात उभा असलेला गहू व हरभरा खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. पातूर आणि अकोट तालुक्यातील फळबागांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने शेतीच्या कामामध्ये व्यत्यय आला आहे. गहू, हरभरा ही पिके भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्‍ह्यात ४,७७० हेक्‍टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने प्राथमिक अहवालात सांगितले आहे. यामध्ये अकोट तालुका सर्वात जास्त नुकसानग्रस्त ठरला आहे. मागील चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपून काढले आहे.


हेही वाचा -शोपियामध्ये चकमक : सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, इंटरनेट सेवा बंद

अवकाळी पावसामुळे ४७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अकोट तेल्हारा आणि बाळापुर तालुक्यात दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. तर बार्शीटाकळी तालुक्यामध्ये 11.82 हेक्टर, मुर्तीजापुर तालुक्यात 113.10 हेक्‍टर, अकोट तालुक्यात 4,050 हेक्टर आणि पातुर तालुक्यात 595.42 हेक्टर नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details