महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 20, 2021, 10:18 PM IST

Updated : Mar 20, 2021, 10:50 PM IST

ETV Bharat / state

अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; फळबागांचे नुकसान

अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकांसोबत फळबागांचे नुकसान झाले.

Heavy rains lashed the area and damaged crops in, akola District
अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; फळबागांचे नुकसान

अकोला -हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नंतर जिल्ह्यातील काही भागात पावसाने विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात जोरदार गारा पडल्यात. त्यामुळे तेथील फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील काही गावात गारा पडल्याची माहिती आहे. 24 तासात 5.2 मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. या पावसामुळे गहू, हरभरा उत्पादकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; फळबागांचे नुकसान

हवामान खात्याने काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील काही गावात तुरळक पाऊस पडला असून किरकोळ स्वरूपाच्या गारा ही बरसल्या. मात्र, आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दिवसभर जोरदार वारा, विजांचा कडकडाट होता. दोन दिवसांत पडलेल्या पावसाची नोंद हवामान खात्याने घेतली असून 5.2 मिमी पाऊस पडला आहे.

सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यासोबत अकोला शहरासह काही गावात किरकोळ गारा ही पडल्यात. पातूर तालुक्यात जोरदार गारांसह पावसाने ही जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात काढणीला तयार असलेला गहू ,हरभरा भिजला आहे. पातूर येथे पडलेल्या गारांमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.

Last Updated : Mar 20, 2021, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details