अकोला - जिल्ह्यात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हजेरीने एकच धावपळ उडाली. वादळामुळे अनेक ठिकाणची झाडे पडली असल्याने शहरातील सर्वच भागातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. यामुळे काहीच्या घरावर झाड कोसळले तर मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली होती.
अकोल्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी - अकोला पाऊस
तौक्ते वादळाचा परिणाम अकोल्यात दिसला. सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. हवेचा आणि पावसाचा वेग खूप मोठ्या प्रमाणात होता. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेकांची धावपळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.
तौक्ते वादळाचा परिणाम अकोल्यात दिसला. सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. हवेचा आणि पावसाचा वेग खूप मोठ्या प्रमाणात होता. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेकांची धावपळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळली. तर शहरातील अनेक भागात विजांच्या तारांवर झाडे कोसळल्याने संपूर्ण शहरातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच कुठेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख एस. एस. साबळे यांनी दिली आहे.