अकोला - अकोट तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पठार नदीला पूर आला. अकोला मार्गावरील दनोरी-पनोरी या दोन गावांना जोडणाऱ्या पूलावरुन पाणी जात असल्याने रविवारी या गावांचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या पुराचे पाणी मात्र जवळच असलेल्या शेतामध्ये गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पठार नदीच्या पहिल्याच पुरामुळे दनोरी-पनोरी गावाचा संपर्क तुटला - Akot taluka
अकोट तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पठार नदीला पूर आला. अकोला मार्गावरील दनोरी-पनोरी या दोन गावांना जोडणाऱ्या पूलावरुन पाणी जात असल्याने रविवारी या गावांचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या पुराचे पाणी मात्र जवळच असलेल्या शेतामध्ये गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
![पठार नदीच्या पहिल्याच पुरामुळे दनोरी-पनोरी गावाचा संपर्क तुटला पुरामुळे गावांचा संपर्क तुटला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12427312-442-12427312-1626018067016.jpg)
शेतात पाणी साचले आहे -
पनोरी-दनोरी दोन गावाचा संपर्क, आरोग्य सुविधा, दळणवळण सुविधा बंद पडल्या आहेत. पनोरी गावाचा मुख्य बाजारपेठ, आरोग्य उपकेंद्र, पशु उपकेंद्र, चोहोटा, अकोट यांच्याशी संपर्क जोडणारा हा एकमेव पूल आहे. कमी उंचीच्या या पुलावरुन पुराचे पाणी वाहतांना दिवसभर गावाचा संपर्क तुटला. यामुळे स्थानिकांना मोठा त्रास दर पावसाळ्यात सहन करावा लागतो. या पुलाची ऊंची लहान असल्याने दरवर्षी वाहून जाणारा भाग यावेळीही वाहून गेला. त्यामुळे आता हा पूल धोकादायक अवस्थेत असून पुलाचा उर्वरित भाग पुराच्या तडाख्याने कधी वाहून जाईल याचा हे सांगणे कठीण आहे. हा पूल कालबाह्य झाला असून त्याची नव्याने निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे. या पूलाची उंची वाढवून नवीन निर्मिती करण्याची स्थानिकांची मागणी अनेक वर्षापासून आहे. पण या मागणीला अद्यापही यश मिळाले नसून पठार नदीवर नवा व उंच पूल उभारणे हे ग्रामस्थांना दरवर्षीच्या त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी आवश्यक आहे.