महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गडबड

शेतातील सर्व कामे संपलेली असून शेतकरी आता फक्त पावसाची वाट पाहत आहे. त्यामुळे शेतकरी पेरणी युक्त पाऊस पडला तर लगेच पेरणीला सुरुवात करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अकोल्यात जोरदार पाऊस
अकोल्यात जोरदार पाऊस

By

Published : Jun 9, 2021, 12:24 PM IST

अकोला- जिल्ह्यात आज दुपारपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी पावसाच्या सरी तर रात्री सव्वानऊ वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे सर्वदूर चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची आता बियाणे खरेदीसाठी गडबड सुरू होणार आहे. त्यामुळे हा पाऊस पेरणीयुक्त झाला तर शेतकऱ्यांकडून पेरणी उरकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पेरणीच्या तायरीला वेग
सर्वत्र सोमवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पेरणीची संपूर्ण तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवलेली आहे. शेतातील सर्व कामे संपलेली असून शेतकरी आता फक्त पावसाची वाट पाहत आहे. त्यामुळे शेतकरी पेरणी युक्त पाऊस पडला तर लगेच पेरणीला सुरुवात करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पेरणी सारखा पाऊस लवकरच होत असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, पेरणीच्या आधी शेतकरी सोयाबीन बियाण्यांचा खरेदी करीता वळला आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधान

अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना पावसाचा जोर गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच वाढला आहे. दोन दिवसाआधी पडलेल्या पावसाची नोंद 30.3 मिलिमीटर एवढी नोंद हवामान वेधशाळेने घेतली होती. त्यावेळी हा पाऊस सर्वदूर पडला नव्हता. मात्र, आता रात्रीचा पाऊस जोरदार पडत असून विजांचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाचा वेग जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खरीपाच्या तयारीत असलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. परंतु, रात्री पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details