अकोला- जिल्ह्यातील पातुर तालुक्यात विजेचा कडकडाट तसेच जोरदार वाऱ्यासह बुधवारी रात्री ८ वाजता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
अकोल्यात विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, तर रस्त्यावर असलेल्या व्यावसायिकांचा चांगलाच गोंधळ उडाला.
अकोल्यात गेले अनेक दिवसांपासून सर्वाधीक तापमान होते. त्यामुळे नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर निघणेही शक्य नव्हते. मात्र, बुधवारी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, तर रस्त्यावर असलेल्या व्यावसायिकांचा चांगलाच गोंधळ उडाला. जोरदार वाऱ्यामुळे वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. तसेच या वादळ-वाऱ्यामुळे पातुरच्या घाटात एक ट्रक उलटल्याची माहिती आहे. मात्र, त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.