अकोला -जिल्ह्यात रविवारी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा सर्वात जास्त फटका अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. येथील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वडाळी देशमुख या गावातील केळी, लिंबू, चिकूच्या बागा उन्मळून पडल्या आहेत. अनेक झाडे मुळासकट पडले आहे. यामुळे फळबाग शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अकोट तालुक्यामधील अवकाळी पाऊस व चक्रीवादळ यामुळे गावातील तारे तुटलेली आहेत. फळ वागांमधील मुख्य केळी, चिकू, लिंबू, कांदा, झाडावरील परिपक्व झालेले केळीचे घड, लिंबू, चिकू जमीनदोस्त केली. सर्व झाडे चक्रीवादळाने नष्ट झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी येथील फळबाग शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा -नायर रुग्णालयाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका; पावसामुळे कोविड ओपीडी, लसीकरण केंद्रात पाणी
आधीच संचारबंदीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याच्या शेतातील मालाला भाव मिळत नाही आहे. परिणामी, हे पीक शेतात सडून जात आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून पिकांचा खर्चही आता लागवडीमधून निघत नाही आहे. शेतकऱ्यांना संचारबंदीने आता निसर्गाने हतबल करून टाकले आहे. दुसरा कुठलाच पर्याय शेतकऱ्यांसमोर नसल्याचे यावरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासनाने त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. तरी परिसरातील झालेल्या नुकसानाची शासनाने थेट बांधावर पोचून पंचनामे, नुकसान भरपाई करण्याची, मागणी वडाळीचे पटवारी, नरेश रतन, अजय अडचुले, शिवप्रसाद गुप्ता, मदन देशमुख, निशांत गणगणे, अरुण मोहकार, गजानन वावरे आदींनी केली आहे.
हेही वाचा -कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवला; गुन्हा दाखल