महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोट, तेल्हारा तालुक्यात अवकाळी पाऊस; भुईमुंग खराब होण्याची भीती - Heavy rain Akola

शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यातच काही ठिकाणी किरकोळ, तर काही भागात मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील अनेक गावात पावसाने जोरदार हजेरी लावली.

भुईमुगाचे नुकसान
भुईमुगाचे नुकसान

By

Published : May 2, 2021, 3:32 PM IST

अकोला - जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि अवकाळी पावसाने अकोट, तेल्हारा तालुक्याला फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला. त्यामुळे काढणीला आलेला भुईमुंग खराब होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यातच काही ठिकाणी किरकोळ, तर काही भागात मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तेथील भुईमुंग खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतामध्ये असलेल्या भुईमुगाच्या शेंगा व कुटार काढण्यासाठी गेलेल्या मजुरांची या वातावरणामुळे चांगलीच दमछाक झाली. काही मजुरांसोबत लहान मुले होती. त्यांना या पावसापासून वाचविण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली.

शेतात भुईमुगाचे खूप मोठे नुकसान झाले. मजूरांनी काढलेल्या शेंगा उघड्याच असल्याने पावसाने पूर्ण भिजल्या. त्या शेंगा आता माती मिश्रित झाल्याने खूप नुकसान झाले. असाच पाऊस अजून दोन दिवस आला तर शेतकऱ्यांना भुईमुगाचे पीक व कुटार खराब होण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाल्याने शासनाने तातडीने सर्वे करून भुईमुग काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details