अकोला- अकोल्यात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. शहरात आज ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिवसभर अंगाला चटके बसणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अकोल्यात उष्णतेची लाट कायम, रस्ते ओस
गेल्या एप्रिल महिन्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसच्यावर गेले होते. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. मे महिना सुरू होताच तापमान थोडेफार कमी झाले होते. मात्र, उन्हाची दाहकता अद्यापही कायम आहे.
उन्हामुळे रस्त्त्यावर असलेला शुकशुकाट
गेल्या एप्रिल महिन्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसच्यावर गेले होते. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. मे महिना सुरू होताच तापमान थोडेफार कमी झाले होते. मात्र, उन्हाची दाहकता अद्यापही कायम आहे. गरम हवादेखील त्यामध्ये भर टाकत आहे. त्यामुळे नागरिक दिवसा फिरायचे टाळत आहे. परिणामी दुपारच्यावेळी बाजारपेठ आणि मुख्य रस्स्त्यांवर नागरिकांची गरदी दिसत नाही. वाहतूक पोलीस मात्र आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकणे बजावताना दिसत आहेत.