अकोला - तालुक्यातील कंचनपूर येथे एक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आठ आरोग्य पथकांनी या गावात ग्रामस्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी 206 घरांना भेटी देऊन 1 हजार 27 ग्रामस्थांचे रविवारी सर्वेक्षण केले गेले. कंचनपूरमध्ये शनिवारी एक कोरोना रुग्ण आढळला होता. यानंतर प्रशासनाने हे गाव सील केले.
कंचनपुरात आरोग्य पथकाने केले नागरिकांचे सर्वेक्षण; कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी
कंचनपूर येथे एक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आठ आरोग्य पथकांनी या गावात ग्रामस्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी 206 घरांना भेटी देऊन 1 हजार 27 ग्रामस्थांचे रविवारी सर्वेक्षण केले गेले. या अहवालानुसार चाळीस तीव्र जोखीम संपर्काचे तर 43 कमी जोखमीचे नागरिक आढळून आले.
याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने या गावात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी मोहिम राबवली. आरोग्य विभागाच्या आठ पथकांनी एकाच दिवसात 1हजार 27 ग्रामस्थांचे सर्वेक्षण केले. या अहवालानुसार चाळीस तीव्र जोखीम संपर्काचे तर 43 कमी जोखमीचे नागरिक आढळून आले. तीव्र जोखीम संपर्काच्या नागरिकांना सत्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर कमी जोखीम असलेल्या 43 नागरिकांना होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या आहेत.
खबरदारी म्हणून गावात आलेले पाहुणे व परराज्यातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीची मोहिम राबविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी घरीच राहावे, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, आजाराची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले. सोबतच गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.