अकोला : जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण ( Cloudy Weather has been Prevailing in District ) आहे. या ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील हरभरा व गहू या पिकांना फटका ( Mansoon Problem Bacteria on Crop ) बसला आहे. त्यामुळे या पिकांची वाढ खुंटली असून, या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला ( Cloudy Weather has been Prevailing in Akola ) आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आलेले आहेत. तसेच, वाढलेल्या तुरीवर ही कीड निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी अधिकच चिंतातूर झाले असल्याची ( Wheat Tur Crop Hit Hard Due to Cloudy Weather ) माहिती आहे.
Cloudy Weather in Akola : ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, तूर पिकांना मोठा फटका; किडीचा प्रादुर्भाव वाढला - Cloudy Weather in Akola
अकोला जिल्ह्यामध्ये मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण ( Cloudy Weather has been Prevailing in District ) आहे. या ढगाळ ( Mansoon Problem Bacteria on Crop ) वातावरणामुळे रब्बीतील हरभरा व गहू पिकांना मोठा फटका बसला ( Cloudy Weather has been Prevailing in Akola ) आहे. त्यामुळे या पिकांची वाढ खुंटली असून, या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला ( Wheat Tur Crop Hit Hard Due to Cloudy Weather ) आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण :हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पावसापेक्षा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा व काढणीला येत असलेली तूर या तिन्ही पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. काढणीला आलेल्या तुरीवर शेतकरी आता फवारणी करीत आहेत. किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून या संदर्भामध्ये कृषी विभाग व महसूल प्रशासनाने मार्गदर्शन करून उपाययोजनेची सूचना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
अतिपावसामुळे अगोदरच शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले :दरम्यान, खरीप हंगामामध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलेही उत्पन्न त्यातून झाले नाही. त्यासोबतच पिकविमा ही शेतकऱ्यांनासुद्धा मिळाला नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत. तसेच, नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत आहेत, असे असतानाही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये गहू व हरभरा हे पीक घेतले आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकरी पिकांवर फवारणी करताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.