महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बच्चू कडू यांची पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट; ऑक्सिजन निर्मितीची केली पाहणी - oxygen generation Paras Power Generation Center

जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथे आज जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील ओझोन वायू निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करून त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करण्याबाबत त्यांनी ही प्रत्यक्ष पाहणी केली.

Paras Power Generation Center visit Bachchu Kadu
पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र बच्चू कडू भेट

By

Published : Apr 22, 2021, 10:50 PM IST

अकोला - जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथे आज जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील ओझोन वायू निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करून त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करण्याबाबत त्यांनी ही प्रत्यक्ष पाहणी केली.

माहिती देताना पालकमंत्री बच्चू कडू

हेही वाचा -अकोला जिल्हा परिषदेने सुरू केले 50 खाटांचे कोविड काळजी केंद्र

पालकमंत्र्यांसोबत विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल रहाटे आदींचा समावेश होता. या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही. त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री येथे उभारल्यास येथून ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. यासाठी तातडीने तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने दिवसभरात पाहणी करून अहवाल द्यावा, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले.

याच परिसरात असलेल्या प्रकल्प विभागाच्या जागेची ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठीही त्यांनी पाहणी केली. या जागेत विद्युतीकरण, लाईट, पंखे, पाण्याची सोय आहे. त्यामुळे, या ठिकाणी हॉल मोकळा करून रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली तर या जागेचा कोविड केअर सेंटर म्हणून उपयोग करता येईल. त्यासाठी तातडीने स्वच्छता व आवश्यक बाबींची कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री कडू यांनी महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा -भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखी वाटतात - प्रकाश आंबेडकर

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details