अकोला - ओबीसींच्या सोयीसुविधांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हा प्रकार सरकारने टाळावा आणि ओबीसींना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज(शुक्रवार) जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
ओबीसींच्या सोयीसवलतींकडे सरकारचे दुर्लक्ष; वंचितने निवेदन देऊन दिला इशारा
ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे, असे असतानाही त्यांच्यावर अन्याय होत आहे. वैद्यकीय, शिक्षण क्षेत्रात ओबीसींच्या विद्यार्थ्यांना स्थान मिळत नाही. तसेच शासकीय नोकरीतील ओबीसींचा बॅकलॉग भरल्या जात नाही. हा प्रकार सरकारने टाळावा आणि ओबीसींना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज(शुक्रवार) जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे, असे असतानाही त्यांच्यावर अन्याय होत आहे. वैद्यकीय, शिक्षण क्षेत्रात ओबीसींच्या विद्यार्थ्यांना स्थान मिळत नाही. तसेच शासकीय नोकरीतील ओबीसींचा बॅकलॉग भरल्या जात नाही आहे. ओबीसींना मागे ठेवण्याचे षडयंत्र हे सरकार करीत आहे. जर सरकार ओबीसींना सोयीसुविधा देत नसेल तर वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आघाडीने दिला आहे.
यावेळी आघाडीचे प्रदेश प्रवक्ता प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, महिला महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, गौतम गवई, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, महादेव शिरसाट, बुधरत्न इंगोले, पराग गवई यांच्यासह आदी उपस्थित होते.