अकोला -अविश्रांत आम्ही काम करीत आहोत, कुठला निर्णय पेंडीग ठेवत नाही आहोत, मागच्या दोन अडीच वर्षात कुठलीच कामे झाली नाही ( No work has been done in two and a half years) आहे. फाइलेचे गठेच्या गठे पडलेली आहेत. शंभर दिवसांमध्ये इतकी आले झाली आहे की त्याचा अहवाल देखील आपल्या पुढे आम्ही मांडू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला दौऱ्यावर ( devendra fadanvis Press conference ) असताना दिली.
Deputy CM Devendra Fadnavis : सत्तेत येऊन सरकारला शंभर दिवस पूर्ण; काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस पाहा - Deputy CM Devendra Fadnavis on Akola Tour
अविश्रांत आम्ही काम करीत आहोत, कुठला निर्णय पेंडीग ठेवत नाही आहोत, मागच्या दोन अडीच वर्षात कुठलीच कामे झाली नाही ( No work has been done in two and a half years) आहे. फाइलेचे गठेच्या गठे पडलेली आहेत. शंभर दिवसांमध्ये इतकी आले झाली आहे की त्याचा अहवाल देखील आपल्या पुढे आम्ही मांडू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला दौऱ्यावर असताना ( devendra fadanvis Press conference ) दिली.

गेली सात आठ वर्षं भेटच - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर ( Deputy CM Devendra Fadnavis on Akola Tour )असताना जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारला शंभर दिवस झालीत, काय सांगाल, या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. तसेच शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह इतर विरोधी पक्षनेते भेटत आहेत यावर ते मजेशीर उत्तर देत म्हणाले, हे लोक गेली सात आठ वर्षं भेटच आहे. इतके भेटले, इतके समीकरण केले, त्यांचे समीकरण चालत नाही, असे आहेंकी मोदीजी लोकांच्या मनामध्ये आहे. मोदीजींपेक्षा मोठीं रेषा ओढुनच मोदींजींची रेषा लहान करतां येतें. परंतु, मोदोजींपेक्षा मोठी रेषा ओढण्याची क्षमता, शक्ती कोणामध्ये आतातरी नाही. आणि शक्ती सोडा मानसिकता देखील नाही. त्यामुळे यांचा प्रयत्न फक्त मोदींजींची लाईन कशी पुसता येईल आहे. परंतु, त्यांची लाईन पुसता येणार नाही. त्यामुळे यांनी वारंवार भेटावे, जेवण करावे, वेगवेगळ्या राज्यात भेटावे, आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis criticize opponents ) मारला.
उध्दवजीनी आपले शब्द मागे घ्यावे - मला एका गोष्टींचे मनापासून वाईट वाटते. उद्धव ठाकरे यांच्या सारख्या नेत्याने शिंदें यांच्या छोट्या नातेवाईकवर टिप्पणी करणे, हे अतिशय खालच्या दर्जाचे आहे. मला असे वाटते की त्यांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजे. मी तर असे म्हणेन की कुठे चाललंय महाराष्ट्र, ज्याचे वय दीड वर्ष आहे, अशा नावावर आपण टीकाटिप्पणी करू लागलो, ठीक आहे, तुमचे असेल त्यांचे पटत नाही, निराशा असेल, पण काही पथ्य पाळली पाहिजेत. मला असें वाटते की मी याबाबत नाराजी व्यक्त करतो, ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या नातवावर टिप्पणी केली आहे, त्यांनी हे मागे घेतले पाहिजे, ही अपेक्षा आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यासह ते इतरही मुद्द्यांवर बोलले.