अकोला- स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मूर्तिजापूर येथे घडली. यामध्ये ३ जण किरकोळ तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन वर्षांच्या लहान मुलीचाही समावेश आहे.
अकोल्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, ५ जण जखमी
मूर्तिजापूर येथे सत्संग भवन जवळ असलेल्या वामनराव खंडागळे यांच्या घरी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मूर्तिजापूर येथे सत्संग भवन जवळ असलेल्या वामनराव खंडागळे यांच्या घरी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजय खंडागळे, भिकाजी सोनवणे उज्वला वामनराव खंडागळे आणि ३ वर्षांची माही मार्कंड यांच्यासह ५ जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे घरातील टीव्ही, कपडे, साऊंड सिस्टिम आणि धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटानंतर जखमींना बाहेर काढणे, त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी शेजाऱ्यांनी मदत केली. अग्निशमन दल आणि मूर्तिजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.