महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरातच गजानन महाराजांची रांगोळी काढून वैष्णवीने अर्पण केली महाराजांच्या प्रगटदिनी श्रद्धा

अकोल्यातील संत गजानन महाराज यांच्या एका भक्ताने घरातच महाराजांची रांगोळी काढून आपली श्रद्धा गजानन महाराजांच्या प्रति अर्पण केली आहे. वैष्णवीने ही रांगोळी रेखाटण्यासाठी पहाटे तीन वाजतापासून सुरुवात केली. तिला ही रांगोळी काढण्यासाठी जवळपास 14 ते 15 तास लागले

अकोला
अकोला

By

Published : Mar 5, 2021, 10:35 PM IST

अकोला- देवाप्रती श्रध्दा अर्पण करण्यासाठी अनेकजण विविध गोष्टी करत असतात. कोणी अनवाणी पायाने पायी जातो, तर लोटांगण घेऊन मंदिरात जात असतो. परंतु, अकोल्यातील संत गजानन महाराज यांच्या एका भक्ताने घरातच महाराजांची रांगोळी काढून आपली श्रद्धा गजानन महाराजांच्या प्रति अर्पण केली आहे.

अकोला

कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीने सर्वच सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर गदा आणली आहे. विदर्भाची पंढरी असलेल्या संत गजानन महाराज यांचा आज प्रगट दिन आहे. या दिनानिमित्त गजानन महाराज संस्थेने भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास मनाई करीत घरीच महाराजांची पूजा करून प्रगट दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याच आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच भाविकांप्रमाणे अकोल्यातील मलकापूर येथे राहणाऱ्या वैष्णवी म्हैसने या युवतीने घरातच 10 बाय 10 संत गजानन महाराज यांची रांगोळी काढून आपली भक्ती महाराजांच्या प्रति अर्पण केली आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी तिच्या घरात एकच गर्दी होत आहे. तिने काढलेली रांगोळी तिला शाबासकीची थाप देणारी ठरत आहे.

वैष्णवीने ही रांगोळी रेखाटण्यासाठी पहाटे तीन वाजतापासून सुरुवात केली. तिला ही रांगोळी काढण्यासाठी जवळपास 14 ते 15 तास लागले आहे. तसेच यासाठी तिला 16 किलो रांगोळी लागली आहे. यासाठी तिला तिच्या घरातील इतर सदस्यांचेही सहकार्य लाभले आहे. आधीपासूनच चित्र काढण्याची आवड असलेल्या वैष्णवीलाही कोरोनामुळे ही संधी चालूनच आली. कोरोना काळाच्या निमित्ताने लागलेल्या संचारबंदीने बाहेर कुठल्याही मंदिरात न जाता स्वतःच्या घरातच संत गजानन महाराज यांची रांगोळी काढली आहे. स्केच तयार करून ही रांगोळी तिने चित्रित केली आहे. यामध्ये विविध रंगाचा उपयोग केला आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या वैष्णविला इतरही चांगले छंद आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details