अकोला- अकोल्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज चारने वाढून ती 13 वर पोहोचली आहे. बैदपुरा, अकोट, पातूरनंतर आता चार जणांवर अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. हे चार ही रुग्ण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे.
कोरोनाचा विळखा : अकोल्यात एकाच कुटुंबातील चार नवे रुग्ण, जिल्हातील आकडा 13 वर - akola news
अकोला जिल्ह्यात आज कोरोनाचे चार नवे रुग्ण आढळले असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
![कोरोनाचा विळखा : अकोल्यात एकाच कुटुंबातील चार नवे रुग्ण, जिल्हातील आकडा 13 वर अकोला शासकीय रुग्णालय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6735437-62-6735437-1586503168032.jpg)
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना अकोल्यामध्ये मंगळवारपर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. परंतु, त्यानंतर रुग्णाच्या संख्येत वाढ झाली. बैदपुरा, अकोट फाईल, पातूर येथील एकूण नऊ रुग्ण सापडले होते. या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच आता आणखी एका कुटुंबातील चार जण सापडले आहेत. या परिवारातील 3 वर्षांची मुलगी, 5 वर्षांचा मुलगा, आई व 30 वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका दीड वर्षाच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
हेही वाचा -नदीपात्रात गावठी दारू बनवणाऱ्यांवर कारवाई; एकाला अटक, तर दोघे फरार