महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यातील तापी नदीच्या पुरात वाहून गेलेला युवक चार दिवसांनी सापडला - अकोला बातमी

टाकळी खुर्द येथील जमीर शहा रोशन शहा हा १८ सप्टेंबरला दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मोहाडी नदीच्या पुरात वाहुन गेला होता.

अकोल्यातील तापी नदीच्या पुरात वाहून गेलेला युवक चार दिवसांनी सापडला

By

Published : Sep 22, 2019, 8:05 PM IST

अकोला -अकोट तालुक्यातील टाकळी खुर्द येथील १५ वर्षीय युवक हा मोहडी नदीच्या पाण्यात वाहून गेला होता. युवकाचा मृतदेह चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मुक्ताई नगर येथील तापी नदीजवळील पुर्णा संगमावर रविवारी दुपारी सापडला. जमीरशहा असे मृत युवकाचे नाव आहे.

अकोल्यातील तापी नदीच्या पुरात वाहून गेलेला युवक चार दिवसांनी सापडला

हेही वाचा - धुळ्यात लाचखोर मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

टाकळी खुर्द येथील जमीर शहा रोशन शहा हा १८ सप्टेंबरला दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मोहाडी नदीच्या पुरात वाहुन गेला होता. यासाठी सतत दोन दिवसांपासून टाकळी (खु) पासून मोहाडी नदी ते पुर्णानदी नेर धामणापर्यंत शोधमोहीम पुर्ण केली. यावेळी जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव नजिकच्या पुर्णा नदीपात्रात मानेगाव येथील एका व्यक्तीस शनिवारी मुलाचा मृतदेह दिसला होता. परंतु, पुर्णानदीला मोठा पूर असल्याने हा मृतदेह समोर वाहत गेला. यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील पुर्णा नदीपात्रातुन पुढे बोटीने शोधमोहीम सुरु करण्यात आली होती.

हेही वाचा - आईला उसने पैसे देण्यास नकार; अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची चाकू भोसकून हत्या

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दिपक सदाफळे, उमेश बील्लेवार, अजय जाधव, महेश साबळे, मयुर सळेदार, कीशोर निलखन, गोपाल पाथरकर, सचिन बंड यांनी शोध घेतला. यावेळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळंके, मानेगाव पोलीस पाटील दिलीप पाटील, चांगदेव पोलीस पाटील भुषण चौधरी हे घटनास्थळी होते. जमिरशहा याचा मृतदेह एवढा कुजलेला होता की जागेवरून ऊचलणेही कठीण होते. यामुळे सर्व यंत्रणा बोटीद्वारे शवविच्छेदनासाठी डॉक्टर शोहेब खान यांना घटनास्थळी आणले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.

हेही वाचा - मुंबईत गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावणारा रिक्षाचालक गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details