अकोला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' असे म्हणून शेतकरी व मजुरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी आज केला. बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे असलेल्या किसान रॅलीसाठी आले असता त्यांनी हे विधान केले.
प्रतिक्रिया देताना माजी कृषिमंत्री अनिल बोंडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ऑनलाइन सभेत शेतकऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करता येईल का, यासाठी प्रयत्न होवू शकतात का, असा मुद्दा उपस्थित केला होता. यावर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी शेतीचा अभ्यास करावा. मग शेतीवर बोलावे. कापूस जर वेचायचा असेल तर ते वर्क फ्रॉम होमने होणार आहे का. ओलित घरी बसून करता येते का, असे म्हणून मुख्यमंत्रीजी आपण वर्षभराआधी म्हणाले होते, की पंचनामे न करता शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आणि बागायतदार यांना ५० हजार रुपये मदत करू. मुख्यमंत्री तुम्ही वर्क फ्रॉम होम करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, शेतकऱ्यांसाठी काही करायचे असेल तर करा, पण शेतकऱ्यांची थट्टा करू नका, असा सल्ला बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
हेही वाचा-अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन