अकोला- बार्शीटाकळी तालुक्यातील कानशिवणी छबिले-टाकळी येथील गावाजवळील जंगलाच्या शेजारी असलेल्या शेतात रस्त्याच्या कडेला बिबट्या आढळला होता. दोन दिवसाआधी शाळकरी मुलांना रस्त्याच्या कडेला हा बिबट्या दिसला होता. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी तत्काळ बार्शीटाकळी वन विभागाला दिली. वन विभागाने पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरा लावून बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या शेतात दिसला होता. त्यामुळे वन विभागाच्या चमूने संपूर्ण जंगल भागाजवळील शेतांची पाहणी केले. परंतु, त्या ठिकाणी त्यांना बिबट्या दिसून आला नाही. परिणामी, वन विभागाने ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. त्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. या भागात सर्वत्र जंगलाचा भाग असल्याने अनेक वन्य प्राणी या जंगलात आहे. सध्या स्थितीत हा बिबट्या जंगलाच्या भागात आहे.