अकोला - अकोल्यात आज सायंकाळी आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एका दिवसात एकूण 37 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 275 वर पोहोचली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कमालीची वाढ झाली आहे. सकाळी मिळालेल्या अहवालावरून 32 जण पॉझिटिव्ह आले होते. त्यात सायंकाळच्या अहवालात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात तीन पुरुष व दोन महिला आहेत. त्यातील तिघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य अकोट फैल व डाबकी रस्ता येथील रहिवासी आहेत.