अकोला - अकोल्यात सोमवारी सकाळी आठ रुग्ण सापडले. तर, सकाळी एका आणि सायंकाळी आणखी एका महिला रुग्णाचा अशा एकूण दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, पाच जणांनी कोरोनावर मात केली.
कोरोना अपडेट : पाच जणांची कोविड -19 वर मात; दोघांचा मृत्यू - akola corona recovered patients
अकोल्यात सोमवारी सकाळी आठ रुग्ण सापडले. तर, सकाळी एका आणि सायंकाळी आणखी एका महिला रुग्णाचा अशा एकूण दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, पाच जणांनी कोरोनावर मात केली.
अकोल्यात हैदरपुरा खदान येथील 36 वर्षीय कोरोना रुग्ण महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला. या महिलेला 2 जून रोजी रुग्णालयात दाखल केले होते. तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात एक महिला व अन्य चार पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील दोन जणांना घरी तर, उर्वरित तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघे सिटी कोतवाली परिसरातील तर, अन्य देशमुख फैल व गायत्री नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*प्राप्त अहवाल-१०६
*पॉझिटीव्ह-आठ
*निगेटीव्ह-९८
आता सद्यस्थिती
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८२१
*मयत-३९(३८+१)
*डिस्चार्ज-५४५
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२३७