महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच सराईत आरोपींना अटक; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई - Five accused arrested in attempted robbery

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या दक्षतेमुळे हे आरोपी सापडले. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police_arrested_robbary_acused
मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला

By

Published : May 3, 2021, 9:34 PM IST

अकोला- दरोडा, जबरी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच जणांना दहशतवाद विरोधी पथकाने आज पातूर रोडवर अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला

पातुर रोडावर एक स्विफ्ट गाडीमध्ये क्रमांक एमएच 04 डीएन - 426 यामध्ये चार पुरुष व एक महिला असे पाच जण विलास प्रकाश काळे, कैलास धुंदन पवार, विजय कैलास पवार, सूरज विजु पवार, शीतल विलास भोसले हे त्यांच्या कारमध्ये होते. त्यांचा संशय आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्यांची चौकशी केली. वाहनांची झडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना तीन बॉटल पारा मर्क्युरी ऑक्सआइड, एक बॉटल ऐसिड, एक चाकू, एक दोर, मिरची पावडर, पाच मोबाइल, कार असा एकूण दोन लाख 93 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
पातुर रोडावर दरोडा, जबरी चोरीच्या गुन्हा करण्याचे उद्देशाने ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 399, 402 नुसार जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - रायगड : सरकारचा निषेध व्यक्त करत पत्रकारांनी केले आत्मक्लेष आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details