महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उष्माघाताचा अकोल्यात पहिला बळी! - अकोल्यात उष्माघाताचा बळी

गत दोन दिवसांपासून अकोल्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. अशातच बुधवारी उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली.

akola
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी

By

Published : May 27, 2020, 6:23 PM IST

अकोला - गत दोन दिवसांपासून अकोल्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. अशातच बुधवारी उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. उष्माघाताचा हा राज्यातील पहिला बळी असण्याची शक्यता आहे. मोरगाव सादिजन येथील किसनराव किनेकर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पाराही वाढतो आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४७ डिग्रीवर पोहोचले आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. हा बाळापूर तालुक्यातील मोरगाव (सादिजन) येथील ४० वर्षीय किसनराव किनेकर रहिवासी होता. उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details