अकोला - जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण तब्बल पन्नास दिवसनानंतर रुग्णालयात पोहोचला असल्याची धक्कादायक माहिती अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'अकोल्यातील पहिला कोरोना रुग्ण पन्नास दिवसानंतर पोहोचला रुग्णालयात' - अकोला कोरोना न्यूज
कोरोना रुग्णाची साखळी शोधणे यंत्रणेला शक्य झाले नाही. आता कोणाला कोरोना आहे आणि कोणाला नाही हे काहीही सांगता येत नाही, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी राज्याचे गृहमंत्री यांनी कोरोनाबाबत अमरावती जिल्ह्याचा आढावा घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अकोला जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत नसल्याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, अनिल देशमुख यांनी या प्रशांचे उत्तर बच्चू कडूच देतील असे म्हणून बच्चू कडू यांना माहिती देण्यास सांगितले.
बच्चू कडू म्हणाले, अकोल्यात जो व्यक्ती सर्वात आधी कोरोनाबधित आढळला त्या व्यक्तीपासून शंभर जणांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या एका डॉक्टरमुळे 80 व्यक्ती कोरोनाबधित झालेत. तसेच तिसऱ्या व्यक्तीमुळे 75 जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोना रुग्णाची साखळी शोधणे यंत्रणेला शक्य झाले नाही. आता कोणाला कोरोना आहे आणि कोणाला नाही हे काहीही सांगता येत नाही, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.