मराठी गझल साहित्य संमेलनाला गजल दिंडीने सुरुवात अकोला - गजलनवाज भिमराव पांचाळे ( Ghajlanwaj Bhimrao Panchale ) यांनी १९७२ मध्ये अकोला येथुन गजल ( Ghazal ) गायनाला सुरवात केली होती. त्याच शहरात पहिल्यादांच गजल सागर प्रतिष्ठान मुंबई, तीष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय १० वे अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाला ( Marathi Ghazal Sahitya Sammelan ) आज सकाळी काढलेल्या गजल दिंडीने सुरुवात झाली. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन -साहित्यप्रेमी गजल ( Marathi Ghazal ) रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या अखील भारतीय मराठी गजल संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्त ज्येष्ठ गजलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गजलकार संदीप माळवी, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, राज्य कर उपायुक्त प्रमोद भोसले यांची उपस्थिती होती.
तसेच स्वागताध्यक्ष म्हणून तीष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे यांची उपस्थितीत होती. यावेळी गजल सागर प्रतिष्ठानचे विश्वस्त गजलनवाज भीमराव पांचाळे, तिष्णगत मल्टीपर्पण वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, अखिल भारतीय मराठी महामंडळाचे डॉ. गजानन नारे उपस्थित होती.
उर्दूचा उगम हा भारतात - गजल, कवितांसोबतच तुकाराम महाराज यांच्या रचनावर दहावे गजल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रकाश टाकला. गजल रचतांना सर्वच भाषांचा उपयोग होत असेल तर काही हरकत नाही. उर्दूचा उगम हा भारतात झाला आहे. गजल ही उर्दूतच नव्हे तर आता मराठी भाषेत होत असून कवी सुरेश भट यांनीच पहिल्या मराठी गजल तयार केल्या असल्याचे ते प्रकर्षाने म्हणाले. कवितांचा उपयोग करीत गजलची रचना करताना अनेक शेर रचले तर ती गजल परिपूर्ण होईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या भाषणात त्यांनी नवीन गजलकरांचे कौतुक करीत नवीन गजलकरांची रचना समाजाचे वास्तव मांडत असल्याचे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले.
गजलचा हा प्रवास खडतर - सुरेश भटांच्या सोबत सुरू झालेला हा गजलचा प्रवास असाच सुरू राहावं, असे वाटते. हे संमेलन मी ज्या शहरात घडलो, त्या शहरात व्हावे, ही इच्छा होती, त्याच दृष्टीने हे संमेलन अकोल्यात घेण्याचे ठरले. यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व गजलश्रोत्यांचे मी आभारी आहे. गजलचा हा प्रवास खडतर असला तरी 50 वर्ष पूर्ण झालेल्या या गजल गायनाचा हा प्रवास असाच निरंतर श्रोत्यांच्या आशीर्वादाने सुरू राहील, अशी अपेक्षा गजलनवाज भिमराव पांचाळे यांनी व्यक्त केली.
कवितेने खूप बळ दिले -कविता कुठल्याही स्वरूपात असते. माणसाच्या जगण्याविषयी ती बोलू पाहते. सुख दुःख विषयी बोलताना फार आनंद होतो. कवितेच व्यवहारात मूल्य राहत नाही. गालीबांची प्रेरणा आज ही घेतो. कवितेने खूप बळ दिले. ते आतापर्यंत टिकतेय. कवितेला पर्याय आहे. कविता या अर्थाने खूप बळ देतो. कवितेशी संबंध जोडला पाहिजे. समृद्ध होण्याचा अनुभव येतो, असेही उद्घाटक चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले.
गझल कार्यावर पीएचडी - गजलकार विद्यानंद हाडके यांच्या 'गज़लसरा' तसेच गजलकार किरणकुमार मडावी यांच्या 'जिंदगी भाकरीच्या दबावात आहे' या गजल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भीमराव पांचाळे यांच्या गजल गायकी व गझल कार्यावर पीएचडी पूर्ण करणाऱ्या डॉ.राहुल भोरे व उर्दू हिंदी मराठी भाषेतील निवडक गजल गायकांच्या गायन शैलीवर पीएचडी पूर्ण करणाऱ्या डॉ.भाग्यश्री पांचाळे यांचा सन्मान करण्यात आला.