अकोला - अकोट फाईलमधील तीन टॉवरजवळ असलेल्या दोन गोदामांना आज दुपारी आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या लागल्या आहेत.
हेही वाचा -मुर्तीजापूर येथील कोरोना वॉर्डातील रुग्णांमध्ये रमतात भाजपचे आमदार पिंपळे
अकोट फाईलमध्ये समीर अहमद खान मौसम खान यांचे स्क्रॅपचे गोदाम आहे. तर, या गोदामाला लागूणच साबीर खान इस्माईल खान यांचे फर्निचरचे गोदाम आहे. स्क्रॅपच्या गोदामाला लागून असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागली. त्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले व दोन्ही दुकानातील साहित्याला आग लागली. पाहता पाहता या आगीने महाकाय रूप धारण केले. या आगीत या दोन्ही गोदामातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलास माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर घटनास्थळी अकोट फाईल पोलीस दाखल झाले होते. आग विझविण्यासाठी पाचपेक्षा जास्त बंबचा वापर होत आहे.