महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला अकोल्यात आग; दस्तऐवजांसह साहित्य भस्मसात - akola fire news

या कार्यालयातून सद्यस्थितीत बंद असलेल्या शकुंतला रेल्वेचा कारभार पाहिला जातो. पत्र्यांनी तयार करण्यात आलेल्या या कार्यालयाला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत कार्यालयात असलेले रेल्वेसंबंधी संपूर्ण दस्तावेज खाक झाले आहे.

Breaking News

By

Published : May 24, 2020, 3:56 PM IST

Updated : May 24, 2020, 4:01 PM IST

अकोला - मूर्तिजापूर-अचलपूर-यवतमाळ दरम्यान चालविल्या जाणाऱ्या शंकुतला रेल्वेचा कारभार चालणाऱ्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला आज आग लागली. आग लागल्याने रेल्वे साहित्यासह दस्तऐवज खाक झाले.

अकोल्यात रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला आग

या कार्यालयातून सद्यस्थितीत बंद असलेल्या शकुंतला रेल्वेचा कारभार पाहिला जातो. पत्र्यांनी तयार करण्यात आलेल्या या कार्यालयाला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत कार्यालयात असलेले रेल्वेसंबंधी संपूर्ण दस्तावेज खाक झाले आहे.

अकोल्यात रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला आग

तर कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येत असलेले दोन संगणक व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

अकोल्यात रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला आग

मात्र, या कार्यालयात महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने ही आग लागली, की लावण्यात आली याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.

अकोल्यात रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला आग
Last Updated : May 24, 2020, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details