अकोला -कुठलीही परवानगी न घेता, शहरातील एका शाळेत सभा घेतल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -देशाला चुकीच्या दिशेने नेऊन भाजपाने आर्थिक स्थिती बिघडवली - जयंत पाटील
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे असलेल्या आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शहरातील ज्युबली इंग्लिश स्कुलमध्ये निवडणूक संदर्भात बैठक घेतली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकातील नायब तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आयोजक श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता, कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाण असतानासुद्धा प्रचार बैठकीचे आयोजन केल्याने कलम २६९, २७०, १८८ भादंवीसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथरोग अधिनियम १९९७ कलम २, ३,४ अन्वये रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.