अकोला -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेहमीच्या पद्धतीने पणनचे थेट परवानाधारक नर्मदा साल्वेस प्रा. ली.ने अडत्यांकडून सोयाबीन बियाणे खरेदी केले. परंतु, नर्मदा साल्वेस यांनी अडत्यांचे दोन महिने झाले तरी पैसे न दिल्याने आज अडत्यानी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका आमदारांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. परंतु, अडत्यांनी त्यांचे ऐकले नाही. शिवप्रकाश कालुराम रूहाटीया आणि लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचा जावेद हुसेन कादरी यास अटक केली आहे. तसेच हा संपूर्ण व्यवहार एक कोटी 87 लाख रुपयांचा आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणन विभागाच्या थेट परवानाधारक नर्मदा साल्वेस प्रा. ली. यांनी सोयाबीन खरेदीसाठी लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनचे शेख जावेद हुसेन कादरी यांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. एप्रिल आणि मी महिन्यात नर्मदा साल्वेसने लक्ष्मी सेल्स यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे सोयाबीन अडत्यांमार्फत खरेदी करून माल खरेदी केला नाही अशी भूमिका घेतली. संपूर्ण प्रकरणाची बाजार समितीने अंतर्गत चौकशी करून लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशन व नर्मदा साल्वेस यांचे परवाने रद्द केले आहे.