अकोला - शिवसेना वसाहतमध्ये पूरग्रस्तांना धनादेश वितरणाच्या कार्यक्रमावेळी प्रभाग क्रमांक 18 मधील शाळा क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पक्ष नगरसेवक आणि शिवसेनेच्या नगरसेविका यांच्यामध्ये बुधवारी दुपारी वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांविरोधात जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भाजपचे नगरसेवक अमोल गोगे यास ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अटक करण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्विन नवले विरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
धनादेश वाटपावरून भाजपा-सेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी; भाजपा नगरसेवकास अटक - धनादेश वाटपावरून भाजपा-सेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी
जुने शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये अतिवृष्टीमुळे गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करून धनादेश वितरणाचा कार्यक्रम शाळा क्रमांक 26 मध्ये ठेवला. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते तथा नगरसेविका सपना नवले यांचे पती यांच्यासह अविनाश गोंगलवार, नितीन गोंगलवार यांनी नगरसेवक अमोल गोगे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप गोगे यांनी तक्रारीत केला आहे.
जुने शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये अतिवृष्टीमुळे गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करून धनादेश वितरणाचा कार्यक्रम शाळा क्रमांक 26 मध्ये ठेवला. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते तथा नगरसेविका सपना नवले यांचे पती यांच्यासह अविनाश गोंगलवार, नितीन गोंगलवार यांनी नगरसेवक अमोल गोगे यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप गोगे यांनी तक्रारीत केला आहे. तर शिवसेनेचे नेते अश्विन नवले यांच्या पत्नी नगरसेविका सपना नवले यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात येऊन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल गोगे, त्याचा भाऊ नवीन गोगे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे करीत आहेत. जुने शहर पोलिसांनी नगरसेवक अमोल घुगे व नितीन गुगलवर यांना अटक केली आहे.