अकोला- आपोती येथे पित्याने आपल्याच मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलगा गहाण ठेवलेली गाडी सोडविण्यासाठी वडिलाजवळ पैशाची मागणी करत होता. यामुळे त्रास्त झालेल्या वडिलाने मुलावर कुऱ्हाडीने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी (दि.१८/१/२०२०) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी वडील भीमराव रंगराव पळसपगार यास बोरगाव मंजू पोलिसांनी अटक केली आहे.
...म्हणून जन्मदात्यानेच केला अविवाहित मुलाचा खून - bhimrao palaspagar murder akola
मृतक सचिन भीमराव पळसपगार हा आरोपी भीमराव रंगराव पळसपगार याचा मुलगा असून तो अविवाहित होता. भीमराव पळसपगार यास दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. सर्वजण एकत्र राहतात. सचिन याची गहाण ठेवलेली दुचाकी सोडवून आणण्यासाठी त्याने वडील भीमराव यांच्याकडे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले १५ हजार रुपये मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी भीमरावने सचिनच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले.
मृतक सचिन भीमराव पळसपगार हा आरोपी भीमराव रंगराव पळसपगार याचा मुलगा असून तो अविवाहित होता. आरोपी भीमराव यांना पळसपगार यास दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. सर्वजण एकत्र राहतात. सचिन याची गहाण ठेवलेली दुचाकी सोडवून आणण्यासाठी त्याने वडील भीमराव यांच्याकडे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले १५ हजार रुपये मागितले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी आरोपी भीमरावने सचिनच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत गावात बातमी पसरताच तंटामुक्त अध्यक्ष बळीराम राघोजी शिरसाट यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी वडिलास अटक करून घटनेत वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष अघाव करीत आहेत.
हेही वाचा-वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या बोलेरोची ट्रॅक्टरला धडक, २ जण ठार