महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder in Akola : पूर्ववैमनस्यातून अकोल्यात बापलेकाचा खून तर महिला गंभीर - ther and son murder

पूर्ववैमनस्यातून बापलेकाचा खून तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुधलम या गावात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. (father and son murder in Akola, mother serious, case was registered at Pinjar police station)

Murder in Akola
अकोल्यात बापलेकाचा खून तर आई गंभीर

By

Published : Nov 24, 2022, 11:58 AM IST

अकोला: अकोला तालुक्यातील दूधलम गावामध्ये पंडित चुलत भावांचे कुटुंब राहते. एक ते दीड वर्षांपूर्वी प्रताप पंडित आणि किशोर पंडित यांच्यामध्ये सांडपाणी व इतर किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या घटनेच्या तक्रारी पिंजर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट केल्यानंतर बुधवारी या संदर्भामध्ये न्यायालयात सुनावणी होती. त्यावेळी हे दोन्ही कुटुंब न्यायालयात असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला. हे दोन्ही कुटुंब रात्री घरी आल्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. प्रताप विठ्ठल पंडीत (वय 52 वर्ष) व सूरज प्रताप पंडीत (वय 26 वर्ष) असे मृत बापलेकांची नावे आहे. तर अनिता प्रताप पंडीत (वय 45 वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (father and son murder in Akola, mother serious, case was registered at Pinjar police station)



कुऱ्हाड, कैची, दगडाने हल्ला केला: किशोर जगन्नाथ पंडित, चंदा किशोर पंडित, रोशन किशोर पंडित, कार्तिक किशोर पंडित, बंडू जगन्नाथ पंडित, निर्मला जगन्नाथ पंडित व एका अल्पवयीन बालकाने मिळून प्रताप विठ्ठल पंडित, सुरज प्रताप पंडित, अनिता प्रताप पंडित यांच्यावर कुऱ्हाड, कैची, दगडाने हल्ला केला. यामध्ये प्रताप पंडित आणि सुरज पंडित हे जागीच ठार झाले. तर अनिता पंडित यांच्या हातावर दुखापत झाली.



सहा जणांना अटक केली:या घटनेची माहिती पिंजर पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांना मिळताच त्यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर या घटनेतील आरोपींचा शोध त्यांनी घेतला. यामध्ये किशोर पंडित व इतर नातेवाईक असे मिळून सहा जणांना अटक केली आहे. या सर्वांना आज बार्शीटाकळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



पुढील तपास सुरू आहे: दुधलम गावामध्ये पंडित कुटुंबातील दोन चुलत भाऊ हे शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होता. या वादाचे परिवर्तन हे बुधवारी रात्री हत्येमध्ये घडले आहे. यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. एक विधी संघर्ष बालक आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details