अकोला - सोयाबीनचा हंगाम संपलेला असतानाही मिळणारा दर मात्र चांगलाच वधारला आहे. सद्यस्थितीत प्रति व्किटंलला पाच हजार रुपयांपेक्षा जास्त दर सोयाबीनला मिळत आहे. मात्र, हजारो शेतकऱ्यांनी साडेतीन हजारांच्या आत दर असतानाच आपला सोयाबीन विक्रीस आणला होता. सध्या बाजारामध्ये मागणी आणि आवकही कमी प्रमाणात आहे. मात्र, सोयाबीनचे वाढलेले दर यास्थितीत शेतकऱ्यांसह व्यापार्यांना देखील फायदेशीर ठरत आहेत.
सोयाबीनचा दर गगनाला; मोजक्याच शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस - शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
सध्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी आहे. काही प्रमाणात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत आहे. जो शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहे. त्या शेतकऱ्याला आता खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. कारण आता सोयाबीनला मिळणारा दर प्रति क्विंटल पाच हजारांच्या वर मिळत आहे.
शेतकऱ्यांनी यापूर्वीच विकला माल-
खरीप हंगामातील सोयाबीन निसर्गाच्या अवकृपेमुळे खराब झाले. ज्या शेतकऱ्यांचे चांगले आलेले सोयाबीन पीकही खराब झाले आणि उत्पादनात घट झाली. परिणामी जास्त नफा मिळण्यापेक्षा शेतकऱ्यांना तोटाच सहन करायला लागला होता. खराब झालेले सोयाबीन आणि आर्द्रता जास्त असल्याने मिळणारा दर सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी न परवडणारा होता. परंतु, रब्बी हंगामासाठी पैशाची गरज आणि उसने घेतलेले पैसे फेडण्याच्या प्रश्न शेतकऱ्यांपुढे होता. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी स्वतः जवळील सोयाबीन बाजारात मिळेल त्या दरात विकून टाकले. त्यावेळी शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला साडेतीन हजार रुपयेच्या जवळपास दराने सोयाबीनची विक्री करावी लागली होती.
शेतकऱ्यांना सुगीचे दिवस-
सध्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी आहे. काही प्रमाणात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत आहे. जो शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहे. त्या शेतकऱ्याला आता खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. कारण आता सोयाबीनला मिळणारा दर प्रति क्विंटल पाच हजारांच्यावर मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. मात्र, केवळ मुठभर शेतकऱ्यांनाच हा आनंद मिळत आहे.
बीओसी मागणीनुसार सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. सध्या सोयाबीन तेल आणि त्यासोबतच ढेपही महाग झाली आहे. या महागाईचा परिणाम काही अंशी असला तरी सोयाबीन सध्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रगती साधणारे पीक ठरत आहे.