अकोला - कापसावर आलेली बोंडअळी आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने शून्य पाठवल्याने बाळापूर तालुक्यातील टाकळी येथील दोन शेतकऱ्यांनी अकोला शहरातील आकाशवाणीच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. बोंड आळी नुकसान भरपाई आणि परतीच्या पावसाच्या नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर तीन तासानंतरआंदोलन मागे घेण्यात आले आहे. अक्षय साबळे व गोपाल पोहरे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर युवा शेतकऱ्यांचे शोलेस्टाईल आंदोलन स्थगित - अकोला लेटेस्ट न्यूज
शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, या मागणीसाठी गोपाल पोहरे, अक्षय साबळे या दोन शेतकऱ्यांनी आकाशवाणी केंद्राच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. अक्षय साबळे व गोपाल पोहरे अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत.
मागील वर्षीचे पीक कर्ज परस्पर कर्जमुक्तीत वळविण्यात आल्याने शेतकऱ्यांचे हातात येणारे पैसे बँकेने लुटून घेतले आहेत. त्यासोबतच सोयाबीन आणि कपाशीवर आलेल्या रोगामुळे पिके पूर्णपणे खराब झाले आहे. बोंडअळीने तर हातचे पीक काढून घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, या मागणीसाठी गोपाल पोहरे, अक्षय साबळे या दोन शेतकऱ्यांनी आकाशवाणी केंद्राच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते.
जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला परतीच्या पावसाचा नुकसानाचा अहवाल पाठविला आहे. पण त्याद्वारे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली. याविरोधात शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होणार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नवीन आकडेवारी शासनाला पाठवावी, ही मागणीही या शेतकऱ्यांनी लावून धरली होती. या युवा शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी यासोबतच अग्निशमन दल व रुग्णवाहिका ही आकाशवाणी केंद्राच्या आत आणण्यात आली होती.