अकोला - दिल्लीतील शेतकरी आंदोलन व केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी पुत्रांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारने कृषी वीषयीचे कायदे रद्द करावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली. शेतकरी पुत्रांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या मुलांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - शेतकरी आंदोलन बातमी
शेकऱ्यांच्या मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारने केले कायदे रद्द करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
![शेतकऱ्यांच्या मुलांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने Farmers' children protest in front of the Collector's office](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9885858-1082-9885858-1608026016907.jpg)
भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा, कमाल शेत जमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, शेतकरी करार किंमत हमी व शेती सेवा कायदा, शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री यासह विविध मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अक्षय राऊत यांनी केले. दिल्लीतील आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात येवू नये, त्यांच्यावर बळाचा उपयोग करण्यात येऊ नये, शेतकरी आंदोलकांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, निदर्शने आंदोलनात शेतकरी पुत्रांनी सहभाग घेतल्याने या आंदोलनाला महत्व प्राप्त झाले आहे.