अकोला -मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी या गावामध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय कर्जबाजारी युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. (yava farmer suicide akola) विशेष म्हणजे, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ शुट केला. त्या व्डिडिओत त्याने या आत्महत्येला महिंद्रा कोटक कंपनीचे अधिकारी जबाबदार आहे. तसेच सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने मी आत्महत्या करीत आहे, असे म्हटले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण बाबूलाल पोळकट असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. (praveen babula polkat farmer suicide)
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आर्थिक विवंचनेत होता -
मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण बाबूलाल पोळकट (वय 32) यांच्याकडे वडिलांच्या नावाने तीन एकर कोरडवाहू शेती. या शेतीवर को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज आहे. त्यासोबतच महिंद्रा कोटकचेही कर्ज आहे. त्याच्याकडे असलेला छोटा ट्रॅक्टर हा फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेला. त्यामुळे प्रवीणच्या मनावर परिणाम झाला. या विवंचनेत आल्यामुळे तो अधिकच व्यतीत झाला. तसेच सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने तो निराश होता.
हेही वाचा -नाशिक : डॉक्टर वधूची होणार कौमार्य चाचणी? अंनिसची त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार
त्याच्या वडिलांना तोंडाचा कर्करोग आहे. आई आजारी आहे, अशा परिस्थितीत पत्नी व दोन मुलींचा सांभाळ तो करीत होता. आई-वडिलांना एकुलता एक मुलगा म्हणून प्रवीण हाच त्यांचा आधार होता. मात्र, बँकेचे कर्ज आणि महिंद्रा कोटक या कंपनीकडून त्याच्याकडे वारंवार होणारा वसुलीचा त्रास, यामुळे प्रवीण आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व व्हिडिओ काढून स्वतःच्या मृत्यूला महिंद्रा कोटकचे अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय मला शांती मिळणार नाही, असेही त्याने त्यात नमूद केले आहे. यानंतर त्याने विष पिऊन करून आत्महत्या केली. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.